मुंबई: Varsha Gaikwad | उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुती व भाजपचे उमेदवार उज्वल निकम आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात लढत झाली.
मतदार संघ हा लोकवस्ती असलेला मतदार संघ आहे. या मतदार संघात वांद्रे पूर्वी सारख्या मध्यमवर्गीय झोपडपट्टीधारक मतदारांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे फिल्मस्टार्स राहात असलेल्या वांद्रे पश्चिमेकडचा हायप्रोफाईल मतदारही आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. उज्वल निकम यांनी जवळपास ५५ हजारांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या तीन फेरीत उलटफेर करत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली.