बहुजननामा ऑनलाइन – आभासी जगातील सौंदर्यवती आणि सुंदर मुलींच्या फोटोंनी सजलेल्या सोशल मीडियावरील प्रोफाइल्सचे सत्य जाणून घेतले तर तुमच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकू शकते. जौनपुर जिह्यातील विनोद (काल्पनिक नाव) ला काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर अशाच एका मुलीच्या प्रोफाइलकडून कॉल बॉय बनण्याची आणि लाखो रूपये कमावण्याच्या संधीची ऑफर मिळाली होती.
नवी दिल्लीतून लॉकडाऊनदरम्यान बेरोजगार झालेला विनोद अस्वस्थ होता. सोशल मीडिया अकाऊंटवर ऑफर मिळाल्यानंतर विनोद एक दोन दिवस विचार करत होता. त्याने विचार केला, नोकरी मिळत नसेल तर कॉल बॉय बनूयात, प्रतिष्ठ नसली तरी पैसे तर मिळतील. अशाप्रकारे विनोद कॉल बॉय बनला, पण त्याला कस्टमर एकही मिळाले नाही, उलट सिक्युरिटीच्या नावावर जमा केलेले हजारो रूपयेसुद्धा बुडाले.
सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक सायबर भामटे सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत आहेत, विनोदसारखे अजून कितीतरी लोक त्यांच्या जाळ्यात अडकले असतील, पण ते समजू शकत नाही. सोशल मीडियाच्या प्रोफाइलद्वारे सुंदर तरूणी आणि वर्किंग वुमनच्या फोटोसह आकर्षीत करण्यासाठी तरूणांना अनेक संदेश पाठवले जात आहेत. मोठ्या कमाईचे गाजर दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत.
अशी लूटते ही गँग
सोशल मीडियावरील प्रोफाइलवरून तरूणांना निवडूण सुंदर तरूणींचे फोटो असलेल्या बनावट प्रोफाइलद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. यानंतर हाय, हॅलोद्वारे चॅटींगला सुरूवात केली जाते. रोज सुंदर मुलींसोबत रात्र घालवण्यासाठी हजारो रूपये मिळण्याची ऑफर दिली जाते. सोबतच यासाठी तयार झाल्यानंतर एक व्हॉट्सअप नंबर देऊन कॉल बॉय बनण्यास तयार तरूणांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाते. सोबतच यासाठी तरूणांना विश्वासात घेण्यासाठी सायबर भामटे महिलांचा वापर करतात. कारण, युवक बोलण्यासाठी अनेकदा फोनसुद्धा करतात. तरूणांने जर फोन केला तर एक तरूणी फोन उचलते…आणि असा संवाद होतो…
प्रश्न – हॅलो… मी कॉल बॉय बनण्यास तयार आहे, यासाठी मला पुढे काय करावे लागेल?
महिलेचे उत्तर – ओह गुड, तुम्हाला नव्या कस्टमरची डिटेल पाठवली जाईल, प्रत्येक कस्टमरकडून तुम्हाला मिळणार्या पैशात आमचे कमिशन असेल. याशिवाय तुम्हाला सिक्युरिटी मनी जमा करावे लागतील.
प्रश्न – सिक्युरिटी मनी, ते कशासाठी ?
महिलेचे उत्तर – ते याच्यासाठी की जर तुम्ही आमच्या कस्टमरसोबत डील केल्यानंतर सुद्धा पोहचले नाहीत, तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल.
होय, ही सर्व प्रक्रिया तरूणांना फवण्याचा धंदा आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. ही गँग तरूणांकडून सिक्युरिटी मनीच्या नावावर हजारो रूपये गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून स्वीकारते. यानंतर अकाऊंटमध्ये पैसे जमा झाल्यानंतर मोबाइल नंबर बंद होतो किंवा ब्लॉक केला जातो. प्रकरण नाजूक असल्याने अनेक तरूण पोलिसांकडे सुद्धा जात नाहीत.
कोरोनाच्या संकटामुळे मोठी फसवणूक
विनोदने सांगितले की, संबंधित प्रोफाइलद्वारे सांगितले जाते की, आमच्याकडे अनेक श्रीमंत आणि सुंदर महिला कस्टमर आहेत. यामुळे अनेक लोक या भामट्यांच्या जाळ्यात पुरूष वेश्या बनण्यासाठी अडकतात. विनोदने सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी सुद्धा संकटात संधी शोधली आहे आणि त्यांची नजर बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या तरूणांवर जास्त आहे.