बहुजननामा ऑनलाईन
कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेलेल्या लोकांसाठी भारतीय डाक विभागानं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये पोस्टमन आणि मल्टीटास्किंगच्या 1371 जागांवर भरती करण्यात येणार आहे.
कसा कराल अर्ज ?
पोस्टाच्या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्जासाठी 100 रुपये आणि परीक्षा शुल्क 400 रुपये असे एकूण 500 रुपये उमेदवाराला भरावे लागणार आहे.
आरक्षित प्रवर्ग आणि महिलांसाठी परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी 3 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे.
उमेदवारानं आपला अर्ज http://www.
किती असेल पगार ?
1)पोस्टमन- मेल गार्ड या पदांसाठी 21,700 ते 69,100
2) मल्टीटास्किंग स्टाफ – या पदांसाठी 18,000 ते 56,900
काय आहेत शैक्षणिक अटी ?
मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण
मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक, दहावी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात होणं आवश्यक
संगणक वापरता येणं आवश्यक
पोस्टमन पदांसाठी टू व्हिलर लायसन्स गरजेचं
जर लायसन्स नसेल 2 वर्षांच्या आत लायसन्स काढणं आवश्यक
राज्यभरातून पोस्ट खात्यात पोस्टमन पदासाठी 1029 पदं उपलब्ध आहेत. तर मेल गार्ड पदासाठी 15 पदांची भरती आहे. अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर या पदासाठी 32 जागा आहेत. तसचं सबऑर्डिनेट ऑफिसर पदासाठी 295 जागा आहेत. पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी 18 ते 27 वयोमर्यादा आहे. मल्टीटास्किंग स्टाफच्या पदांसाठी 18 ते 25 वर्षांची मर्यादा आहे. SC,ST,PWD प्रवर्गांसाठी वयाच्या मर्यादेत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळं सरकारी नोकरीसाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची मुदत सुरू झाली आहे.