बहुजननामा ऑनलाइन – घरफोड्या, चेन स्नॅचिंगसोबतच दुचाकी चोरटे अक्टिव्ह झाले असून, शहरातील विविध भागतून ५ दुचाकी चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकी पार्किंग केल्यानंतर ती वापस येईपर्यंत राहते की चोरीला जाते या चिंतेत नागरिक राहत आहेत.
याप्रकरणी सहकारनगर, वारजे, मार्केटयार्ड, येरवडा या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरात घरासमोर पार्क केलेली २५ हजारांची दुचाकी चोरुन नेली आहे. चव्हाणनगरमधील पंचवटी सोसायटीसमोर ही घटना घडली. दुसऱ्या घटनेत वारजे जकात नाका परिसरात घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली आहे. तर तिसरी घटनेत चोरट्यांनी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील एक दुचाकी चोरुन नेली. बिबवेवाडीतील इंद्रिरानगर परिसरातून दुचाकीची चोरी करण्यात आली आहे.
काही क्षणात दुचाकी चोरली
दुचाकी चालवित असताना अचानक उलटी आल्यामुळे रस्त्यावर बाजूला थांबलेल्या तरुणाची दुचाकी चोरुन नेली आहे. ही घटना एअरपोर्ट रस्त्यावरील देवकर वस्तीजवळ घडली आहे. याप्रकरणी तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित तरुणाला उलटी आल्यामुळे त्याने दुचाकी थांबविली. चावी दुचाकीलाच ठेउन तो उलटी करण्यासाठी दूर गेला असता, दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरुन नेली.