बहुजननामा ऑनलाईन टीम – Vaalvi 2 | झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ या सिनेमाची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांची आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. वेड या चित्रपटा पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ (Vaalvi 2) या चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याआधी परेश मोकाशी यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’,’ चि. व चि. सौ. कां.’अशा दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला असून ‘वाळवी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘वाळवी’ चित्रपटाला मिळणार घवघवीत यश आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस एकत्र साजरा करण्यासाठी एक खासगी पार्टी आयोजित करण्यात आली होती.
या सक्सेस पार्टीत सहलेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी आणि वाळवी चित्रपटाची टीम उपस्थित होती.
या सक्सेस पार्टीत वाळवी सिनेमाचे निर्माते आणि झी स्टुडिओजचे हेड मंगेश कुलकर्णी
यांनी वाळवी च्या पुढच्या भागाची म्हणजेच वाळवी 2 ची (Vaalvi 2) घोषणा केली.
वाळवी चा शेवट बघता आता वाळवी-2 मध्ये काय बघायला मिळतंय यासाठी प्रेक्षक हि उत्सुक झालेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Vaalvi 2 | sequel of superhit marathi movie vaalvi is announced by paresh mokashi and madhugandha kulkarni
हे देखील वाचा :
Aaditya Thackeray | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले…