नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बलात्कार आणि खून प्रकरणात ज्या आरोपीला पोलीस शोध घेत होते, त्याच प्रकरणी मृत मुलीचाच व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसही हादरले आहेत. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे.
वैशाली जिल्ह्यात एका तरुणीच्या घरच्यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. दुसर्या दिवशी पोलिसांना या मुलीचा मृतदेहही सापडला. त्यावेळी या मुलीवर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले. तिचा मृतदेह सापडल्यानंतर एफआयआर नोंदवित मारेकरीचा शोध सुरू केला. मात्र ज्या मुलीचा शोध पोलीस घेत होते, तीचाच व्हिडीओ पोलिसांना सापडला. मुख्य म्हणजे या मुलीच्या कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते. संबंधित मुलीने व्हिडीओमध्ये, मी माझ्या मर्जीने घरातून पळून जाऊन लग्न केले आहे. माझ्या घरचे मुद्दाम खोटा गुन्हा दाखल करुन याला हत्येचे प्रकरण बनवले आहे. एवढेच नाही तर तिच्य कुटुंबियांना तिने फोन करुनही जिवंत असल्याचे सांगितले तरी त्यांनी गुन्हा दाखल केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सध्या पोलिसांपुढे ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती कोण? असा प्रश्न समोर आला आहे. आता पुन्हा संपूर्ण प्रकरणाच्या सुरूवातीपासूनच पोलिसांनी याचा नव्याने तपास सुरू केला आहे.