इटावा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्याच्या उसराहार पोलीस ठाण्यात हिंदूंची आराध्य देवी दुर्गामातेबाबत बौद्ध कथेत कथित अश्लील टिप्पणी केल्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर कथावाचक महिलेवर भावना दुखावणे आणि समाजात द्वेष पसरवण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक ग्रामीण ओमवीर सिंह यांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शनिवारी सायंकाळी तथाकथित कथावाचक रजनी विरूद्ध आक्षेपार्ह टिप्पणीचा व्हिडिओ आणि सीडी काही लोकांकडून देण्यात आली आणि तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक तपासानंतर आयपीसीच्या कलमांमध्ये तिच्या विरोधात आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
ऊसराहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीकमपुर येथे राहणार्या महिला कथावाचकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या कालावधीपासून वायरल होत होता. या व्हिडिओमध्ये ही महिला हिंदू देवता दुर्गामातेबाबत आक्षेपार्ह टिपण्णी करून भावना दुखावत होती. ज्याबाबत अनेक हिंदू संघटनांकडून कथित कथावाचक रजनी बौद्धवर कारवाई करण्याची मागणी शासन आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश तोमर यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर त्यांनी ऊसराहार पोलिसांना कथित कथावाचक महिलेवर कारवाईकरण्याचे निर्देष दिले होते. भाजपा विभाग अध्यक्ष राहुल राज सिंह यांनी हिंदूंच्या भावना दुखावणे आणि समाजात द्वेष पसरवण्यावरून गुन्हा दाखल केला आहे. कलम 295 आणि आयटी अॅक्टचे कलम 66 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लवकरच होऊ शकते अटक
उसराहार पोलीस ठाणे प्रमुख अमरपाल सिंह यांनी सांगितले की, लवकरच आरोपीला अटक करून जेलमध्ये पाठवले जाईल. याप्रकरणी हिंदू संघटनांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे. हिंदू युवा वाहिनीचे ब्लॉक अध्यक्ष रजनीश मिश्र, बजरंग दलाचे सुधांशु सक्सेना, विहिपचे ब्रह्मचंद पांडे, भाजपा युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष प्रशांत तिवारी, भाजपा माजी विभागीय अध्यक्ष अरविंद गुप्ता, जिल्हा कार्यकारी समिती सदस्य संजू बाबू, जिल्हा मीडिया प्रभारी प्रशांत मिश्रा यांच्यासह अन्य लोकांनी या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.