फ्लोरिडा : वृत्तसंस्था – अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने तब्बल ९ वर्षांनंतर इतिहास रचला आहे. आपल्या भूमीतून अंतराळात २ अंतराळवीरांना पाठविण्यात त्यांना यश आले आहे. अमेरिकेने ९ वर्षानंतर प्रथमच आपल्या भूमीवरुन अंतराळात अंतराळवीरांना पाठविले आहे. यापूर्वी अमेरिका रशियाच्या मदतीने अंतराळवीरांना अवकाशात पाठवत होती.
https://twitter.com/JimBridenstine/status/1266816726857060354
नासाच्या अॅडमिनिस्ट्रेटर जिम ब्रायडेनस्टीन यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली.अमेरिकेने आपल्या भूमीवरुन रॉकेटमार्फत अंतराळवीर पाठविण्यात आले आहेत. मला नासा आणि स्पेस टीमचा खूप अभिमान आहे. अमेरिकन वेळेनुसार दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी हे रॉकेट लाँच करण्यात आले.
यापूर्वी हे उड्डाण बुधवारी २८ मे रोजी करण्यात येणार होते. मात्र, उड्डाणासाठी काऊंट डाऊन सुरु झाल्यानंतर खराब वातावरण निर्माण झाल्याने ते २ दिवस पुढे ढकलावे लागले होते. या रॉकेटमधुन अंतराळवीर रॉबर्ट बेहनकेन, आणि डग्लस हर्ले हे अंतराळवीर अवकाशात गेले आहे. २०११ मध्ये स्पेस शटल प्रोग्राम संपल्यानंतर पहिल्यांदाच ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे.