नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरुद्ध आणि प्रतिगामी बँकिंग सुधारणेविरोधात सोमवारी व मंगळवारी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाची आज सकाळी सुरुवात झाली. त्यामुळे देशभरातील सरकारी बँकांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. नवी दिल्ली, पाटणापासून अगरतळापर्यंतच्या विविध शहरात बँक कर्मचार्यांनी बँकांच्या मुख्य कार्यालयाबाहेर निर्दशने करण्यास सुरुवात झाली आहे.
सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्याला सर्व बँक कर्मचार्यांच्या संघटनांनी विरोध केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी देशातील एकूण ९ बँक कर्मचारी संघटनांची मध्यवर्ती संघटना असलेल्या युनायटेड फोरमने दोन दिवसांचा संप करण्यात आला आहे. आजच्या संपात १० लाख बँक कर्मचारी सहभागी झाल्यामुळे देशभरातील बँकांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. या संपात राज्यातील १० हजारांहून अधिक शाखांतील अंदाजे ५० हजार बँक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
संपामुळे बँकांच्या शाखेत प्रत्यक्ष होणारे रोकड भरणा व रोकड काढणे तसेच धनादेश वटणे व कर्जे देणे, कर्जांना मंजुरी देणे ही कामे रखडणार आहे.
मात्र, या संपात खासगी बँक कर्मचारी सहभागी नाहीत. तसेच बँकांचे ऑनलाईन व्यवहार सुरु राहणार आहेत.