मुंबई : बहुजननामा ऑनलाईन– शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. २६ जानेवारीला म्हणजेच उद्या उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तलाव पाळी परिसरात वैद्यकीय शिबीराला भेट देणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आनंद आश्रमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्या दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे हे महाशिबीरात येतील. पारी १२.५० मिनिटांनी ते टेंभी नाक्यावरच्या आनंदमठाला भेट देणार आहेत. दुपारी १.१५ वाजता उद्धव ठाकरे चरई जैन मंदिरात जाणार आहेत. दुपारी १.४५ ते २.३० पर्यंतची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. यानंतर दुपारी ३ वाजता उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. असा उद्धव ठाकरे यांचा उद्याचा नियोजीत ठाणे दौरा राहणार आहे.
याअगोदर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या नवरात्रोत्सवादरम्यान ठाणे येथे आल्या होत्या. त्यावेळी टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते. त्यावेळी देखील ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडाचे केंद्रबिंदू हे ठाणेचं राहिले.
ठाण्यातील जवळपास सगळेच पदाधिकारी आणि नेते शिंदे यांच्यासोबत गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालय देखील ठाण्यातच आहे.
शिवसेना पक्षाच्या वाढीमध्ये ठाणे जिल्ह्याचे योगदान फार मोठे मानले जाते.
शिवसेनेचे आणि ठाण्याचे एक वेगळेच नाते आहे.
मुंबईच्या अगोदर ठाण्यातच शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता.
त्यानंतर ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray to be in thane first time in eknath shinde home ground after shivsena crisis
हे देखील वाचा :