मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेची (Shivsena) झालेली वाताहत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागली आहे. 40 आमदार फोडल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे पक्षावर हक्क सांगत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेना नेते आक्रमक झाले असले तरी त्याच्या मनातील सल वारंवार बाहेर येत आहे. आताही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मनातील दुःख मांडले आहे. माशाचे अश्रू दिसत नाहीत, असे म्हणत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मी नंतर पंढरपूरला जाईन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत म्हणाले की, आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) जवळ आली आहे. हजारो भाविक, वारकरी पंढरपूरात निघाले आहेत. मलाही निमंत्रण आले आहे. मी नंतर पंढरपूरला जाईन, दर्शन घेईन. मातोश्रीवर (Matoshri) जनतेचे लोंढेच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी बोलणार आहे, बोलत राहीन, पण सैनिकांच्या मनावर दडपण वाढेल असे बोलणार नाही.
भावना मलाही आहेत
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त करताना म्हणाले, शिवसेना प्रमुखांना मागे एकदा विचारले होते की तुम्हाला वाईट वाटते की नाही? त्यावेळी ते म्हणाले होते की माशाचे अश्रू दिसत नाहीत. भावना मलाही आहेत, वाईट मला ही वाटले. मी आजही बोलेन, उद्याही बोलेने. माझ्या सैनिकांवरचे दडपण कमी करणे हे काम आहे. मला जो त्रास झाला तो कोणाला झाला नसेल.
मोठ्या मनाची माणसे आजही शिवसेनेत
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, धनुष्यबाण शिवसेनेपासून (shivsena Bow and Arrow Symbol) कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर (Ballot Paper) चिन्ह महत्त्वाचे आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाचे चिन्ह लोक बघतात, माणूस बघून मतदान करतात. ज्यांना या साध्या माणसांच्या मेहनतीने मोठेपण मिळाले, मोठी झाली ती माणसे गेली. ज्यांनी यांना मोठे केले ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसे आजही शिवसेनेत आहेत..
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजही शिवसैनिकांच्या मनगटात ताकद
शिवसैनिकांचे कौतूक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमदार (MLA) जाऊ शकतो, पक्ष जाऊ शकत नाही.
जनतेने आणि शिवसैनिकांनी संभ्रमात राहू नये. जे आमदार माझ्या सोबत राहिले त्यांचे मी जाहीर कौतुक करतो.
काही वाट्टेल ते होवो आम्ही हटणार नाही, या जिगरीची माणसे जिथे असतात तिथेच विजय असतो.
शिवसेनेचे काही वाकडे होऊ न देण्याची ताकद आजही शिवसैनिकांच्या मनगटात आहे.
Web Title :- Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray says nobody can take away shiv senas bow and arrow symbol
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी मानले बंडखोर आमदारांचे आभार, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले