Uddhav Thackeray | ‘… तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील’, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Maharashtra Politics | bjp leader ashish shelar replied to uddhav thackeray for calling mogambo to amit shaha

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना (Shivsena) मानत नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान (PM) होतील, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले. लोकशाहीचे रक्षण करावं ही निवडणूक आयोगाला (Election Commission) विनंती आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बुधवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिंदे गटाचा दावा हस्यास्पद

पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दवा हस्यास्पद आहे. त्यामुळे शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अंधेरीच पोटनिवडणूक (Andheri by-Election) लढवणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे असे ही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

16 सदस्य अपात्र होण्याची शक्यता

शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली असल्याचे ते म्हणाले. सदस्य अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले. आमच्या शपथपत्रावरही (Affidavit) आक्षेप घेतला आहे. लोकशाहीचे रक्षण करावं ही आयोगाला विनंती आहे. पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण करतो. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य

शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंनाच (Balasaheb Thackeray) शोभून दिसतो.
म्हणून तो शब्द आम्ही गोठवला किंवा तसाच ठेवला.
त्यानंतर मी शिनसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि गेली काही वर्षं मी कारभार बघतोय.
शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार त्यांनी काही पदांची निर्मिती केली.
त्यात विभागप्रमुख हे पद आहे. आयोगाने ज्या गोष्टी सांगितल्या, त्या आम्ही पूर्ण केल्या आहेत.
आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र आम्ही सादर केली आहेत. आमची सदस्यसंख्याही आम्ही दाखवली आहे,
असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

 

 

Web Title :-  Uddhav Thackeray | maharashtra shivsena uddhav thackeray press conference in mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | शोरुम चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन उकळली खंडणी, सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

Pune Kasba Bypoll Election | एवढीच ताकद होती तर टिळक, घाटे, बापट यांना निवडून आणण्यात काय अडचण होती ?

Pune Crime News | माथाडीच्या नावाने खंडणी मागणार्‍या रवी ससाणे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल