मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी सपत्निक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधक ताकदीनिशी एकत्र आले मात्र आपण भाजपला (BJP) आस्मान दाखवू शकतो याचा आत्मविश्वास रवींद्र धंगेकर यांनी दिला. साधारण 30 वर्षापासून भाजपचा असलेला बालेकिल्ला भुईसपाट करुन आपण जिंकू शकतो हा आत्मविश्वास केवळ पुणेकरांनाच नाही तर महाराष्ट्राला आणि देशातील जनतेला दिला. त्यामुळे पुढील निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने काम करुन जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कसब्यात शिवसैनिकांनी जीवाचं रान करुन मला मदत केली. निवडणुकीत माझ्यामागे खंबीर उभे राहिले, याबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे धन्यवाद मानल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. यावेळी खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) , आमदार सचिन अहिर (MLA Sachin Ahir), काँग्रेस नेते मोहन जोशी (Congress leader Mohan Joshi) उपस्थित होते.
कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले 'मविआ' चे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख,आमदार आदित्यजी ठाकरे, 'मविआ' चे नेते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/wefnaY7UjG
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 8, 2023
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स.का.पाटील (S.K.Patil) विरुद्ध जॉर्ज फर्नांडिस
(George Fernandes) यांच्या लढतीची आठवण करुन दिली.
ते म्हणाले जॉर्ज फर्नांडिस नावाच्या नवख्या उमेदवाराने काँग्रसचे मातब्बर उमेदवार स.का.पाटील यांना
पराभवाची धूळ चारली होती. जॉर्ज फर्नांडिस यांनी घोषणा दिली होती की आपण-तुम्ही-आम्ही स.का. पाटलांना पाडू शकतो. सर्वांना असं वाटलं होतं की सका पाटलांसारखा उमेदवार असताना जॉर्ज फर्नांडिस याचं काय करु शकणार? पण चमत्कार झाला आणि जर्ज निवडून आले. त्याच विजयाची आठवण आज कसब्याने करुन दिल्याचे ठाकरे म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तुम्ही पंतप्रधान होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. माझ्या मनात असं कोणतंच स्वप्न नाही.
स्वप्नात मी रमणारा-दंगणारा नाही. जी जबाबदारी येते ती मी पार पाडतो.
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर आली होती, ती ही खमकेपणाने मी पार पाडली.
पण एक नक्की देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम देशातल्या जनतेने खांद्यावर घेतली पाहिजे,
असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Web Title : Uddhav Thackeray | congress mla ravindra dhangekar met shiv sena uddhav thackeray at matoshree after wining kasba bypoll election
हे देखील वाचा :