वॉशिंग्टन : अमेरिकेत सत्तांतरणावरून राजकीय संकट सुरू असले, तरी चीनबाबत त्यांची निती स्पष्ट आहे. फ्लाइट मॉनीटर एयरक्राफ्ट स्पॉट्सनुसार, अमेरिकेने नुकतीच चीनच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात (एडीआयझेड) दोन लाँगरेंजची बॉम्बवर्षक विमाने पाठवली होती.
सुधारला नाही तर…
अमेरिकेचे हे एक पाऊल एकप्रकारे चीनला उघड इशारा आहे की, जर तुमच्या कारवायांमध्ये सुधारणा झाली नाही, तर यूएस एयरफोर्स तुमच्या घरात घुसून मारण्याची क्षमता बाळगून आहे. अमेरिकन विमाने अशावेळी चीनी हवाई हद्दीत दाखल झाली जेव्हा ड्रॅगन एक मोठा नौदल युद्धसराव करत आहे.
सर्वात मोठा पेलोड
फ्लाइट मॉनीटर एयरक्राफ्ट स्पॉट्सने मंगळवारी सकाळी सांगितले की, दोन यूएसए बी एफ -1 बॉम्बवर्षक विमानांनी चीनच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केला आणि काही वेळाने परत आली. बी 1- बी मध्ये कोणत्याही बॉम्बवर्षकच्या तुलनेत सर्वात मोठा पेलोड आहे आणि अमेरिकन लष्कराने अगोदर सुद्धा याचा वापर केला आहे.
हेरगिरी तर नाही
अशाप्रकारच्या मोठ्या विमानांना हेरगिरीच्या मिशनवर तैनात केले जात नाही, पण असे मानले जात आहे की, अमेरिकेने चीनला इशारा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. एयरक्राफ्ट स्पॉट्सच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, यूएस विमानांचे शेवटचे लोकेशन पूर्व चीन समुद्रात चीनच्या हवाई क्षेत्रात होते.
दिशा बदलणार का ?
अमेरिका पूर्व आशियामध्ये शांतता आणि संतुलन कायम राखण्याच्या मिशनवर आहे आणि त्यांनी चीनी सीमेमध्ये विमाने पाठवून पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, अंतर्गत राजकीय संकटामुळे त्यांची नीती प्रभावित झालेली नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर असे मानले जात आहे की, जो बायडेन यांची भूमिका चीनबाबत काहीशी नरम असू शकते. परंतु हे त्यांनी सत्ता सांभाळल्यावरच हे स्पष्ट होणार आहे.