चास : बहुजननामा ऑनलाईन – खेड तालुक्यातील आव्हाट येथे ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. यात 2 जणांचा जागीच मृ्त्यू झाला असून 1 जण गंभीर जखम जखमी झाला आहे. सदर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या घटनेनंतर आता परिसरातून हळहळ व्यक्ती केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आव्हाट येथील आनंदीआई येथून डबर (दगड) घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा वळणावरील उतारावर अपघात झाला. ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यानं ट्रॅक्टरही उलटला असावा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भयानक अपघातात ट्रॅक्टर चक्काचूर झाला आहे.
सदर अपघातात संतोष सोमाजी किर्वे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर दत्ता पुनाजी आढळ (वय 33) आणि विलास गंगाराम बुरूड (वय 29) हे जागीच ठार झाले आहेत. किर्वे यांना उपचारासाठी पाठवलं गेलं आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीष गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बीएल गिजरे आणि पोलीस काँस्टेबल पीएन गेंगजे यांनी तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.