बहुजननामा ऑनलाईन टीम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांची तुलना अमेरिकन दिगज्ज रॉकस्टार एल्विस प्रिस्लीशी केली. “हाऊडी मोदी” कार्यक्रमातील त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांचे तुमच्या पंतप्रधानांवर प्रेम आहे आणि ही चांगली गोष्ट आहे.
ह्यूस्टन येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात रेकार्डब्रेक ५०,००० भारतीय-नागरिकांनी हजेरी लावली. मोदींबरोबर स्टेजवर असलेले ट्रम्प म्हणाले, “माझ्या उजवीकडे बसलेला हा गृहस्थ त्यांना आवडतो तसेच नागरिकांमध्ये देखील त्यांच्याप्रती आवड आहे. ते एल्विससारखे आहेत. एल्विस प्रिस्ली परत आल्यासारख वाटत आहे. ”
दरम्यान, एल्विस एक अमेरिकन गायक आणि अभिनेता होता. २० व्या शतकाच्या सर्वात प्रमुख सांस्कृतिक व्यक्तींत त्याचा मानला होता. त्याला बर्याचदा ‘किंग ऑफ रॉक अँड रोल’ म्हणूनही संबोधले जाते. ट्रम्प म्हणाले, “मला आठवते की पूर्वीचे भारताचे गरीब देश म्हणून वर्णन केले गेले होते. तेथे बरेच अंतर्गत मतभेद होते. त्याने वडिलांप्रमाणेच सर्व देशाला एकत्र केले. ते भारताचा पिता आहे. ”
Visit : bahujannama.com