मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – फेक ‘टीआरपी’ प्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास खानचंदानी यांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने बार्कच्या (BARC) च्या माजी अधिकाऱ्याला आज (गुरुवार दि.१७ डिसेंबर) अटक केली आहे.
फेक ‘टीआरपी’ प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून, आज पुन्हा विशेष पथकाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) चे माजी मुख्य ऑपरेशन ऑफिसर (सीओओ) रोमिला रामगढिया (Romil Ramgarhia ) यांना ताब्यात घेतले आहे. बार्क संस्थेशी निगडित ही पहिलीच कार्यवाही आहे.
कोण आहे रोमिला रामगढिया?
टीव्ही वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या मोजण्यासाठी बार्क ही संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेवर मागील सहा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या भारतातील चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमिल रामगढिया यांनी अलीकडेच आपला राजीनामा सोपवला होता. २०१४ पासून बार्क इंडियात ते चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून रुजू होते. रामगढिया १८ वर्षाहून अधिक काळापासून मीडिया, टेलिकॉम आणि मॅन्युफॅक्टरिंग सेक्टरमध्ये काम करत आहेत.