बहुजननामा ऑनलाइन टीम – आरपी घोटाळाप्रकरणी ( TRP) रिपब्लिक चॅनलच्या ( Republic TV) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या याप्रकरणी 11 आरोपी अटकेत आहेत. त्यापैकी एका आरोपीने चॅनलचा टीआरपी(TRP ) वाढवण्यासाठी दरमहा 15 लाख रुपये मिळत असल्याची कबुली दिली आहे.
अभिषेक कोळावडे असे या आरोपीचे नाव आहे. कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै हे सात महिने आरोपीला दरमहा 15 लाख रुपये मिळत होते. म्हणजे दरमहा 15 लाख रुपयेप्रमाणे मिळणारी रक्कम 1 कोटीच्या घरात आहे. अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली आहे. तसेच यातील काही रक्कम वितरक असलेल्या आशीष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली असून उर्वरित रक्कम हवाला माध्यमातून आल्याचे त्याने म्हटले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी चौधरीच्या घराची आणि ऑफिसची झडती घेतली. यामध्ये 11 लाख 72 हजार रुपये अभिषेक याच्या घरातून 2 लाख रुपये हस्तगत केले. दरम्यान, मॅक्स मीडिया चालवणाऱ्या अभिषेक कोळावडेने चौकशीत आशीष चौधरीचे नाव घेतल्याने 28 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अद्यापही चौकशी करत आहेत. याशिवाय याप्रकपरणी अन्य आरोपी रमजी वर्मा, दिनेश विश्वकर्मा आणि उमेश मिश्रा यांची देखील नावे समोर आली आहेत.