मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने पोलिस दलातील तब्बल ९७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आज (सोमवार) सहाय्यक पोलिस आयुक्त / उप अधीक्षकपदी बढती देवून बदली केली. दरम्यान, गृह विभागाने आजच ७ पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत तर पुण्यातील सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांची पालघर जिल्हयात झालेली बदली रद्द केली आहे.
बदली झालेल्या अधिकार्यांची नावे आणि बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे – अरूण जगताप (उप अधीक्षक – मुख्यालय, नागपूर, बदली आदेशाधीन ते अप्पर अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), प्रितम विकास यावलकर (उपविभागीय अधिकारी, कन्नड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण, बदली आदेशाधीन ते उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे), जयराम दत्तात्रय मोरे (सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर ते सहाय्यक आयुक्त, ठाणे शहर), अनिल निवृत्ती कदम (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, शाहुवाडी उपविभाग, कोल्हापूर), संदीप रघुनाथ गावित (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, गंगापूर उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण), अर्जुन नरसिंग भोसले (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर उपविभाग, अकोला) आणि अशोक रमेश थोरात (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा).