टोकिया : वृत्तसंस्था – Tokyo Olympics | मेरी कोम (Mary Kom) हिच्या आश्चर्यकारक पराभवानंतरही बॉक्सिंगमध्ये भारतासाठी आज सकाळी एक खुषखबर मिळाली आहे. (Tokyo Olympics) महिला वेल्टरवेट (६४ – ६९) लोव्हलिना बोगोर्हेगने चायनीज तायपेईच्या चिन चिन निएनला ४-१ असे पराभूत केले असून आपल्या पदकाची निश्चिती केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बॉक्सिंगमध्ये ऑलंपिक पदक जिंकणारी मेरी कॉम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर लव्हलिना बोर्गाेहेन (Lovlina Borgohain) ही सध्याच्या काळातील तिसरी भारतीय बनली आहे. ती अवघ्या २३ वर्षांची आहे. पण तिने तैवानच्या माजी विश्वविजेत्या चिन चिन विरुद्ध धीराने सामना करीत तिच्यावर मात केली.
#TokyoOlympics | Boxing, Women's Welterweight (64-69kg), Quarterfinal 2: Lovlina Borgohain beats Chinese Taipei's Chin-Chen Nien 4-1, assured of a medal pic.twitter.com/gxKKQkZee0
— ANI (@ANI) July 30, 2021
मेरी कोमनंतर भारताची बॉक्सिंगमध्ये सर्व आशा लोव्हलिनावर केंद्रीत झाली होती.
लोव्हलिना आणि तिची तैवान प्रतिस्पर्धी दोघेही आक्रमक व एकमेकांवर जोरदार मुक्का मारत होते.
पहिल्या फेरीत तिने आघाडी घेतली. दुसर्या फेरीत तिने ५-० गुण घेत आपली आघाडी वाढविली.
आपली ही आघाडी कायम ठेवत लोव्हलिना हिने ४-१ अशी ही लढत जिंकून आपले पदक निश्चित केले.
Web Title :- Tokyo Olympics | Boxing Women’s Welterweight 64-69kg Quarterfinal 2 Lovlina Borgohain beats Chinese Taipei s Chin Chen Nien 4-1 assured of a medal
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune News | पुण्यात बेकायदेशीररित्या 830 प्रकरणांची दस्तनोंदणी; 2 अधिकारी तडकाफडकी निलंबीत