बहुजननामा ऑनलाईन –
मेष
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. व्यवसायात केलेल्या कामांमधून भरपूर लाभ मिळेल, यामुळे मन प्रसन्न होईल. सामाजिक आणि धार्मिक कामात सहभागी व्हाल. यामध्ये काही पैसे देखील खर्च होतील. सायंकाळी थोडा थकवा आणि डोकेदुखी जाणवू शकते, यासाठी आरोग्याची काळजी घ्या. संततीच्या विवाहासंबंधी एखादी शुभवार्ता समजू शकते. कार्यक्षेत्रात वातावरण अनुकूल असेल. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल.
वृषभ
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. जर एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर आपल्या आई-वडीलांचे आशीर्वाद घेऊन जा, यामुळे यशप्राप्ती होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. सायंकाळ एखाद्या धार्मिक ठिकाणी किर्तन, भजनात घालवाल, यामुळे मनशांती लाभेल. आईशी वाद होऊ शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा. संततीची चांगली वर्तणूक आणि त्यांचे यश आवडेल.
मिथुन
आजचा दिवस अडचणींचा आहे. जर एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तणावात असल्याने निर्णय घेण्याची क्षमता कमजोर असेल, ज्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात. सायंकाळचा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत मौजमस्तीत घालवाल. नोकरीत वरिष्ठ अधिकार्यांची कृपा असेल. विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता वाटेल.
कर्क
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. प्रगती खुप दिवसांपासून रखडली असेल तर भरपूर लाभ देईल. आज रात्री बाहेर खाणे टाळा, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. आई-वडीलांना डोळ्यांशी संबंधित समस्या होऊ शकते. नोकरीत वाणीद्वारे एखाद्या अधिकार्याला आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात एखादी शुभवार्ता समजेल, जी आर्थिक स्थिती सुदृढ करेल.
सिंह
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यापारात काहीतरी विशेष होणार आहे. व्यापारात काही नवीन परिवर्तन करावे लागेल, जे भविष्यात उत्तम लाभ देतील. रोजगाराशी संबंधीत जातकांना उत्तम संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारी कंबर कसून करावी लागेल. सायंकाळी एखाद्या मित्राकडून धनलाभ होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी एखादी शुभवार्ता समजू शकते.
कन्या
आजचा दिवस खुप व्यस्ततेचा आहे. व्यापारासाठी धावपळ करावी लागेल, जर एखादा प्रवास करावा लागला तर आवश्य करा, कारण यामुळे एखादी खास डील फायनल होऊ शकते, ज्याची तुम्हाला मोठ्या काळापासून आशा होती. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांना छोट्या प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता.
तुळ
आजचा दिवस व्यापारासाठी खुप महत्वाचा आहे, विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात आणि दंडसुद्धा होऊ शकतो. यासाठी जोखमीचे कोणतेही काम टाळा. जवळपासच्या लोकांना मधुर वाणीने आपलेसे करावे लागेल, तेव्हाच काम यशस्वी करू शकता. एखादी संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्व बाजू तपासून घ्या.
वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र आहे. एखाद्या मौल्यवान वस्तूमुळे उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे. शत्रुसुद्धा धाडस आणि शौर्यामुळे तुमच्या समोर पराभव पत्करेल आणि तुम्ही तुमच्या उद्दीष्टात यशस्वी व्हाल. संततीविषयी प्रेमभावना वाढेल. जोडीदाराला एखादी भेट देऊ शकता. नोकरीत पद आणि अधिकारांमध्ये वाढ होईल. सासरच्या बाजूकडील एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील तर विचार करून द्या, कारण ते परत येण्याने नात्यात दरी पडू शकते.
धनु
आजचा दिवस संमिश्र आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा देवावर पूर्ण निष्ठा असेल, ज्यामुळे त्यांना लाभ सुद्धा होईल. बुद्धी विवेकांने काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे व्यवसाय वाढेल. अडकलेले पैसे आज मिळू शकतात. संततीला आरोग्याची एखादी समस्या होऊ शकते, ज्यामुळे मन अस्वस्थ राहील. आपल्या वडीलांसाठी आज एखादी भेट आणू शकता.
मकर
आजचा दिवस आनंदाचा आहे. हातात मोठ्या प्रमाणात पैसा येऊ शकतो, ज्यामुळे मन आनंदी होईल. भागीदारीत केलेल्या व्यापारात भरपूर लाभ होईल. जोडीदाराकडून सर्वप्रकारचे सुख मिळेल. सायंकाळी वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा छोटी-मोठी दुखापत होऊ शकते. समोर असे खर्च येतील, जे इच्छा नसतानाही करावे लागतील. एखादा कौटुंबिक वाद मोठ्या काळापासून सुरू असेल तर तो आज संपेल.
कुंभ
आजचा दिवस विचापूर्वक निर्णय घेण्याचा आहे. कारण धैर्याने घेतलेले निर्णय लाभ देऊ शकतात. घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. रोजच्या गरजांसाठी काही खर्च करू शकता. एखाद्या नव्या व्यवसायात सुद्धा गुंतवणुक करायची असेल तर आवश्य करा कारण यातून पुढे जाऊन भरपूर लाभ होईल. संततीच्या नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश प्राप्त होईल.
मीन
आजचा दिवस काही अडचणी आहे. आरोग्याच्या बाबतीत आज अस्वस्थ दिसाल. पचनक्रिया किंवा पोटाशी संबंधीत समस्या होऊ शकते. व्यापारासाठी काही नव्या योजना बनवाल आणि त्या यशस्वी करण्यासाठी भरपूर प्रयत्न कराल. आज एखाद्या बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते सहज मिळू शकते. कौटुंबिक बिझनेससाठी वडीलांकडून सल्ला घ्याल. जोडीदार प्रत्यक अडचणीमध्ये सोबत राहील.