बहुजननामा ऑनलाईन – बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आता एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही रिपोर्टसच्या दाव्यानुसार नुसरत जहाँ 6 महिन्यांची गर्भवती आहे. मात्र तिचा नवरा उद्योगपती निखील जैन याला ती गर्भवती असल्याची कोणतीच माहिती नाही. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, निखील जैन आणि नुसरत जहाँ यांचे लग्न मोडण्याच्या स्थितीत आहे. गेल्या 6 महिन्यापासून निखील नुसरतसोबत राहत नाही. यात नुसरत जर गरोदर असेल तर ते मुलं माझ नाही, अस निखीलने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि निखील एकमेकांपासून वेगळे राहतात. नुसरत जहाँ गरोदर असल्याच्या बातम्या काही रिपोर्टमधून छापून आल्या आहेत. परंतु नुसरत अन् कोणत्याही टीमकडून या बातमीला दुजोरा दिला नाही. परंतु सोशल मीडियावर यावर प्रचंड चर्चा सुरू आहे. दरम्यान नुसरत जहाँने निखील जैनसोबत 19 जून 2019 रोजी लग्न केले होते. दोघांचे लग्न हिंदू, मुस्लिम प्रथा परंपरेनुसार झाले होते. लग्नानंतर नुसरतने कपाळात सिंदूर लावून दुर्गा पुजेतही सहभागी झाली होती. त्यावेळी अनेक कट्टरतावादी मुस्लिमांनी नुसरत जहाँवर टीकास्त्र सोडले होते.
यश दासगुप्तासोबत नुसरत जहाँ रिलेशनशिपमध्ये?
गेल्या काही दिवसांपासून नुसरत जहाँ ही बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिलं गेल आहे. तसेच न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दोघंही राजस्थानला गेले होते. मात्र या चर्चांवर नुसरत, निखिल आणि यश दासगुप्ता यांच्याकडून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आले नाही.
कृपया हे देखील वाचा:
खळबळजनक ! कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रसिध्द चांदी व्यापाऱ्याची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन आत्महत्या
…म्हणून 70 वर्षांच्या आजींनी थोपटली भाजप खासदार डॉ. सुजय विखेंची पाठ
संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले – ‘भाजपानं ते पत्र आणि शिवसेनेनं फसवलं यामधून बाहेर पडावं’