नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेटींग अॅप्स वापरणार्यांनी सावध होण्याची गरज आहे. पॉप्युलर टिंडर डेटींग अॅप्स, ग्रिंडर, OKCupid सारख्या अॅप्स वापरणार्या युजर्सचा डेटा धोक्यात आहे. नॉर्वे कंज्यूमर कौन्सिलचा दावा आहे की, या अॅप्सवरील सध्याच्या युजर्सची खासगी माहिती अॅड टेक कंपन्यांसोबत शेयर केली जात आहे. रिपोर्टनुसार डेटींग अॅप्समधील युजर्सची वैयक्तिक माहिती दुसर्या कंपन्यांनासोबत शेअर करणे युरोपियन डेटा प्रायव्हसी कायद्याचे उल्लंघन आहे.
नॉर्वे कंज्यूमर कौन्सिल हा सरकारच्या मदतीने चालणारा नॉनप्रॉफिट ग्रुप आहे, ज्याने सांगितले की ऑनलाइन जाहिरातींसाठी काम करणार्या कंपन्या स्मार्टफोन यूजर्सचे प्रोफाइल ट्रॅक करत आहेत. नॉर्वेच्या या कौन्सिलने सायबर सिक्युरिटी कंपनी Mnemonic सोबत 10 अॅन्ड्रॉइड अॅप्सचा अभ्यास केला. या अभ्यासात आढळून आले की हे अॅप्स 135 वेग-वेगळ्या थर्ड पार्टी अॅड कंपन्यांना आपल्या युजर्सचा डेटा शेयर करत आहेत.
यावर त्यांनी सांगितले की स्थिती पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर आहे. यावर कौन्सिलने युरोपियन रेग्युलेटर्सना सक्तीने जनरल डेटा प्रायव्हसी रेग्युलेशन कायदा लागू करण्यास सांगितले आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, Period tracker अॅप आणि Virtual makeup app Perfect 365 सुद्धा असे अॅप्स आहेत, जे युजर्सची माहिती अॅड सर्व्हिससोबत शेयर करतात.
Visit : bahujannama.com