थेऊर : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या माहेरच्या माणसांना सोडून जाताना एखाद्या मुलीचे मन जस भारावून जात त्याप्रमाणे मला आज थेऊर सोडताना अनुभव होत आहे माझ्या मनात कायम थेऊरचा स्नेह अविस्मरणीय राहील या शब्दात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज थेऊर मदत केंद्राचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना निरोप देण्यात आला लोणी काळभोर पोलिस स्टेशन चा पुणे शहरात समावेश झाल्याने पुणे ग्रामीण मधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या इतर पोलिस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत थेऊर येथे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी पदभार स्वीकारला त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल काळे, आबा काळे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष मारुती कांबळे, दलित महासंघाचे आनंद वैराट, बबन कुंजीर, याकूब शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर, पोलीस नाईक नितीन सुद्रीक, पोलीस मित्र संतोष गायकवाड व ग्रामसुरक्षा रक्षक जवान उपस्थित होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.
लोणी काळभोर पोलीस ठाण्या अंतर्गत थेऊर येथे कार्यावर असताना संदीप कांबळे यांनी आपली कामातून कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून छाप निर्माण केली होती या मदत केंद्रातील गावामध्ये युवकांना एकत्र घेऊन रात्रगस्ती साठी ग्रामसुरक्षा दलाची उभारणी करून घरफोड्या, चोरी यावर आळा बसवला आजही थेऊर येथील युवक त्याच उत्साहाने रात्र गस्त घालत आहेत यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक सूरज बंडगर याचे मार्गदर्शन घेऊन या युवकांचे मनोबल वाढवले.तसेच पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी या पाच गावात शिस्तीत कडेकोट बंदोबस्त ठेऊन प्रत्येकाला नियमाचे पालन करण्यास भाग पाडले.
यावेळी नवनियुक्त पोलीस अधिकारी चिवडशेट्टी यांनी थेऊरकरांना त्याच सेवेची हमी देत ग्रामस्थांकडून आपणास तेच प्रेम व सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. आज कांबळे यांनी निरोप देताना सर्वच भावनिक झाले होते विशेषतः संदीप कांबळे यांनाही आश्रू आवरता आले नाहीत.