बहुजननामा ऑनलाइन टीम – इंटरनेट असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे काहीतरी वेगळ्या गोष्टी केल्यावर लोक खूप लवकर व्हायरल होतात. अलीकडच्या काळात अशीच एक संकल्पना बरीच लोकप्रिय होत आहे. काही महिला साड्यांमध्ये बॅकफ्लिपसारख्या आव्हानात्मक गोष्टी करत आहेत आणि या महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत.
View this post on Instagram
24 वर्षीय भारतीय जिम्नॅस्ट पारुल अरोरा अंबालाची असून ती गेल्या 15 वर्षांपासून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. तिने 35 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर जिम्नॅस्टिकच्या व्हिडिओंना सामान्यतः 5 ते 10 हजार लाईक्स मिळतात, परंतु जेव्हा ती साडीमध्ये हे स्टंट करते तेव्हा ही संख्या लाखोंच्या आसपास पोहोचते.
व्हाईस इंडियाशी बोलताना अरोराने म्हटले होते की ‘साडी परिधान करून केलेल्या स्टंटचा व्हिडिओ लोकांना खासकरून महिलांना जास्त आवडतो कारण या महिलांना हे माहित आहे की साड्यांमध्ये बेसिक मुव्हमेंट करणे खूप कठीण आहे, तर कुठेतरी या स्त्रिया यापासून प्रेरित होतात. साडीमध्ये बॅकफ्लिप करणे किंवा कार्ट व्हील्स सारख्या गोष्टी करणे आव्हानात्मक आहे आणि या स्टंटच्या मदतीने मला लोकांना प्रेरित करावेसे वाटते.
पारुल अरोराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती ट्रिपल बॅकफ्लिप करताना दिसली आहे. अरोरा ही नॅशनल लेव्हल गोल्ड मेडल विजेती आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती साडी परिधान करून आपल्या मित्राबरोबर जिम्नॅस्टिक्स करताना दिसली होती. पारुल म्हणाली की हे स्टंट करताना ती तीन वेळा पडली आहे आणि विशेषत: साडीमध्ये हे स्टंट करणे कठीण आहे.
View this post on Instagram
ऑक्टोबर 2020 पासून 17 वर्षीय इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट मिली सरकारचे व्हिडिओ देखील खूप ट्रेंड होत आहेत. ती देखील अनेक आउटफिट्समध्ये स्टंट करते पण तिचे साडीमधले स्टंट्स खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतात. याशिवाय गेल्या वर्षी सप्टेंबरपासून इश्ना कुट्टी नावाची महिलाही साडी नेसून हूला हूप आणि बॅकफ्लिप सारखे स्टंट्स करत असून तिचे व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहेत.