अकोला : बहुजननामा ऑनलाईन – सोनार समाजाने आपसी मतभेद बाजूला ठेवून संघटीत होत समाजाची पर्यायाने देशासाठी काम करण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. पुरुषोत्तम भांडेकर यांनी केले. शहरातील श्री संत गजानन महाराज संस्थान येथे आयोजीत श्री संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पुरुषोत्तम भांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून श्याम वर्मा, दिलीप गौरकर, मधुकर खुणे, प्रदीप गौरकर, किशोर पंडितकर, सुभाष भांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. यावेळी संदीप गौरकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. पुढे बोलताना डॉ.भांडेकर म्हणाले की, समाजबांधवांनी जुन्या अनिष्ठ रूढी परंपरा बाजूला ठेवणे काळाची गरज असून युवकांनी उच्च शिक्षण घेऊन सुसंस्कृत व जवाबदार नागरिक बनावे. दरम्यान, सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष मधुकर खुने व इतर मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामूहिक महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला नाना भांडेकर, प्रभुदास कल्याणकर, ज्ञानेश्वर वाढणकर, महेश अंजनकर, गणेश अर्धापूरकर, जीवन भांडेकर, रमेश महाळकर, गोपाल पागनीस, गजानन अंजनकर, रामा गौरकर, जितेश पंडितकर, अतुल भांडेकर, किशोर वर्मा, राम इवरकर, आतिश बोकन, संतोष नवले, राहुल गौरकर, बानोरे, मिलिंद भांडेकर, प्रशांत नवले, तेजेश कल्याणकर, प्रमोद गौरकर, सुरेश अंजनकर, सोपान वाढणकर, कचरुलाल वर्मा, नारायण वर्मा, गोवर्धन वर्मा, सुरेश वर्मा, किशोर वर्मा, अभिजीत पाटील आदि समाजबांधव तसेच व्यपारी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल कल्याणकर यांनी तर उपस्थितांचे आभार विनोद बनाईतकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संत नरहरी सोनार बहुउद्देश्यीय संस्था च्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.