बहुजननामा ऑनलाईन
फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणे (पुणे व्यापारी संघ)नं दुकानं सुरू ठेवण्याची वेळ वाढवून मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहलं आहे.
काय लहिलंय पत्रात ?
आपल्या पत्रात पुणे व्यापारी संघानं लिहिलंय की, “सध्या अधिक मास सुरू आहे. महाराष्ट्रात याला खूप महत्त्व आहे. या कालावधीत स्त्री वर्ग आपल्या सौभाग्यासाठी पैंजण आणि जोडवी यात अधिक भर घालून ती नवीन खरेदी करतात. तसंच जावयास अधिक मासाचा वाण देण्यासाठी चांदीचं पूजेचं सामान किंवा भांडी खरेदी करतात.”
https://twitter.com/
https://twitter.com/
“दि 17 ऑक्टोबर 2020 पासून हिंदू सणातील दोन मोठे व महत्त्वाचे सण नवरात्रोत्सव व दीपावली सुरू होत आहे. या दोन्ही सणात सर्व व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळं सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो. दीपावलीनंतर लगेचच लग्नसराई सुरू होत आहे. लग्नाच्या खरेदीसाठी पुणे शहरात अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुरुवात झाली आहे.”
“सध्या दुकानं सुरू ठेवण्याची वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे. ती वाढवून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पुणे शहरातील नोकरदार वर्ग ऑफिस किंवा कामावरून आल्यानंतर खरेदीला जात असतो. त्याला खरेदीसाठी फक्त एक तास मिळतो. त्या एक तासात तो पूर्ण खरेदी करू शकत नाही. 7 वाजल्यानंतर अनेक ग्राहकांना खरेदी करता येत नाही आणि त्यांना घरी परत जावं लागतं.”
“महाराष्ट्र राज्य सरकारनं हॉटेल्स आणि बारला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की, दि 17 ऑक्टोबर 2020 पासून रात्री 9 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी तसंच पुणे व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींना यासंबंधी भेटण्याची वेळ देण्यात यावी” असंही पत्रात नमूद केलं आहे.