पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Rajiv Gandhi Zoological Park Pune Reopen | कोरोनामुळे मागीलवर्षी १४ मार्चपासून बंद असलेले कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park Pune Reopen) येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्यासाठी महापालिका (Pune Corporation) प्रशासनाने सुरूवात केली आहे. प्राणी संग्रहालय सुरू झाल्यास पर्यटनालाही गती मिळणार आहे.
मागीलवर्षी ९ मार्चला कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये गर्दीची ठिकाणी टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरूवात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, प्राणी संग्रहालय अशा सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने १४ मार्चपासूनच या संस्था व उपक्रम बंद ठेवले होते. परंतू देशभरातच कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लॉकडाउन (Lockdown) जाहीर केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
–
पुढे कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढ उतार होत राहील्याने अत्यावश्यक सेवा सुरु करण्यात आल्या.
अशातच यावर्षी फेब्रुवारी ते मे दरम्यान दुसर्या लाटेने तडाखा दिला.
मात्र, यावर्षी जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनाची तीव्रता कमी होत गेली.
त्यामुळे माध्यमिक शाळा, कोचिंग क्लासेस, मैदाने, उद्याने, मंदिरे, चित्रपट आणि नाट्यगृहदेखिल सुरू करण्यात आली आहेत.
मात्र, प्राणी संग्रहालय अद्याप बंदच ठेवण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाचा सध्याचा वेग आणि जवळपास शंभर टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने
प्रशासनाने १ डिसेंबरपासून शहरातील एकमेव राजीव गांधी प्राणी संग्रहालय सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्याचा (Rajiv Gandhi Zoological Park Pune Reopen)
प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती संग्रहालयाचे अधीक्षक राजकुमार जाधव (Rajkumar Jadhav) यांनी दिली.
Web Title :- The Rajiv Gandhi Zoological Park in Katraj will be open for tourists from December 1 pune corporation