पुणे बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीत आरएसएसचे लोक घुसले आहेत आणि प्रकाश आंबेडकरांची भुमिका भाजपला मदत करणारी आहे असे गंभीर आरोप करणाऱ्या लक्ष्मण मानेंवर महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या दोन महिन्यांनी ते बोलताना दिसत आहेत. लक्ष्मण मानेंना प्रदेशाध्यक्ष पद न दिल्याने ते आरोप करत आहेत.
माझ्यावर आक्षेप होता तर मग याआधी वंचित बहुजन आघाडीच्या झालेल्या बैठकांमध्ये ते का बोलले नाहीत. लोकसभा निवडणूकीच्या दोन महिन्यांनी माने आमच्यावर आरोप करत आहेत. पक्षाने प्रदेशाध्यक्षपद न दिल्याने ते असे आऱोप करत आहेत असे उत्तर गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.
असे आहेत लक्ष्मण मानेंचे आरोप
आमच्यामुळे भाजपला लोकसभेत १० जागा मिळाल्या. प्रकाश आंबेडकरांच्या भुमिकेमुळे प्रतिगामी शक्तींना फायदा होतो आहे. विधानसभेतही प्रकाश आंबेडकरांनी ही भुमिका घेतली आहे. हा पक्ष वंचितांचा राहिलेला नसून त्यात आरएसएसचे लोक घुसले आहेत. गोपीचंद पडळकर, अजारीया हे आरएसएसचे एजंट आहेत असे गंभीर आरोप लक्ष्मण माने यांनी केले आहेत.