अहमदाबाद : बहुजननामा ऑनलाईन – गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात गोध्रा रेल्वे स्टेशनवर सुमारे 19 वर्षांपूर्वीच्या कारसेवकांना जाळण्याच्या घटनेतील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. गुजरात पोलिसांनी गोध्राहून रफीक हुसैनला अटक केली आहे.
पंचमहल पोलिसांनुसार, रफीक हुसैन त्या कोर ग्रुपचा भाग होता ज्याने ग्रोध्रा कांडाचा कट रचला होता आणि मागील 19 वर्षापासून फरार होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन जवळ एका घरावर छापा मारण्यात आला जेथून रफीक हुसैनला अटक करण्यात आली.
पोलिसांचे म्हणणे आहे की, ट्रेनची कंपार्टमेंट जाळण्यासाठी पेट्रोलची व्यवस्था करणे, जमवाला भडकवणे आणि संपूर्ण कट रचण्यात रफीक हुसैनचा मोठा हात होता. त्याच्यावर मर्डर आणि दंगल भकडवण्याचा चार्ज लागलेला आहे.
गुजरातमध्ये 27 फेब्रुवारी 2002 ला गोध्रा स्टेशनवर करसेवकांनी भरलेली ट्रेन जाळण्यात आली होती. या दुर्घटनेत एकुण 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. यानंतर गुजरातमध्ये 2002 च्या दंगली झाल्या होत्या.
पोलिसांनी माहिती दिली आहे की, रफीक हुसैन त्यावेळी एक मजूर म्हणून स्टेशनवर काम करत होता. जेव्हा ट्रेन आल्यानंतर दगडफेक करण्यात आली आणि पेट्रोल टाकण्यात आले, तेव्हा हा सुद्धा त्यांच्यापैकी एक होता. परंतु त्या घटनेनंतर रफीक हुसैन येथून पळून गेला आणि दिल्लीच्या जवळपास राहू लागला.
पोलिसांनी सांगितले की, नुकतेच आम्हाला त्याबाबत माहिती मिळाली आणि त्याने कुटुंबाला येथे आणल्याची माहिती मिळाली. आता तो घरी भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्यास पकडले.