बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे दरवर्षी नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन(decision of the winter session) मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. हे अधिवेशन कधी घ्यायचे याबाबत नोव्हेंबरच्या शेवटी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता. मात्र ही बैठक काही झाली नाही. आता ही बैठक ३ डिसेंबरला होणार आहे. पण त्याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची दाट शक्यता आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन रद्द केले होते. त्यानंतर मुंबईतील अधिवेशनही रद्द होणार अशी चर्चा पाठोपाठ सुरू झाली. कारणही त्याला तसेच आहे. दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यापही हि वाढ थांबलेली नाही त्यामुळे यासर्व परिस्थितीचा विचार करूनच अधिवेशनाचा निर्णय होणार आहे. मात्र, निदान चार दिवसांचे तरी अधिवेशन घ्यावे असा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अध्यक्ष पटोले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची १ डिसेंबर २०१९ रोजी बिनविरोध निवड झाली होती, त्याला आज एक वर्ष झाले. युपीएससी विद्यार्थ्यांचा विधानभवनात सत्कार, नागपूरच्या विधानभवनात कायमस्वरुपी अस्थापना सुरू करणे, त्या ठिकाणी संसदीय प्रशिक्षण केंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा अशा अनेक कामांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.