नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर येथील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निखिल सोमकुंवर (२५) आणि वतन गोमकले (२५) असं या आरोपींच नाव आहे. पीडित विद्यार्थिनी बी.कॉमच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती आई आणि लहान भावासोबत राहते.
या घटनेतील आरोपी निखिल सोमकुंवर आहे. हा मुलीच्या कुटुंबियांच्या परिचयाचा आहे. पूर्वी निखिल मुंबईत नोकरी करायचा. काही काळापूर्वी नागपूरला आला. तो एका खासगी कंपनीत मॅनेजर आहे. त्यांची आणि या पीडितेची शाळेत असल्यापासून फेसबुकवर फ्रेंडशिप आहे. यामुळे त्यांची मैत्री वाढत गेली. १७ जुलैला निखिल या पीडितेच्या घरी आला. त्याने त्या मुलीला हाताने बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने ही गोष्ट कोणालाच न सांगितल्यामुळे त्याची हिम्मत अजून वाढली.
दरम्यान १९ जुलै रोजी दुपारी दीड वाजता निखिल आपला मित्र वतन गोमकलेसोबत पुन्हा तिच्या घरी आला होता. त्यांच्याकडे बिअरच्या बाटल्याही होत्या. त्यांनी बिअरचे सेवन केले. पिडीतेलाही जबरदस्तीने मद्य पाजत तिच्यावर बलात्कार केला. व याबद्दल कोणालाही सांगितले तर तिच्या भावासह जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर ते पळून गेले. काही दिवस पीडितेच्या आईला तिच्या वागणुकीवर शंका येत होती. त्यामुळे तिच्या आईने नातेवाईकांच्या मदतीने मुलीची चौकशी केली. बुधवारी पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि गुंडगिरीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. दारू पिऊन बलात्कार केल्याने पोलिसही अस्वस्थ आहेत. पोलीस आरोपीची विचारपूस करीत असून घटनेचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.