बहुजननामा ऑनलाईन टीम : टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC) ऑपरेटिंग पदांसाठी भरती सुरु आहे . या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षे निश्चित केले गेले आहे. दिलेल्या संबंधित लिंकवर उमेदवार अर्ज भरू शकतात.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता ८ वी, १० वी आणि १२ वी पास असणे आवश्यक आहे. ही पात्रता संबंधित ट्रेडनुसार वेगळ्या प्रकारे निश्चित केली जाते. तसेच या पदांसाठी अर्ज करण्याचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित केले गेले आहे.
उत्तराखंड येथे ऑपरेटिंग या पदासाठी १०० जागांची भरती होणार आहे. २१ सप्टेंबर २०१९ पासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात होणार असून २०ऑक्टोबर २०१९ ही अंतिम तारीख असणार आहे.
उमेदवाराच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा आणि सूचना डाउनलोड करा. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
Visit : bahujannama.com