सांगली : बहुजननामा ऑनलाईन – सांगली येथील कृष्णा नदीत उडी मारून एका कापड विक्रेत्याने आत्महत्या केली आहे. तर त्याने विषारी द्रव पिऊन नदीत उडी घेतली. अतुल दत्तात्रय मोरे (वय, ३२ ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. या घटनेची सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती, अतुल मोरे खणभागातील एका सोसायटीमध्ये राहत होते. त्यांचा कापड विक्रीचा व्यवसाय होता. रविवारी पहाटे ते घरातून बाहेर पडले होते. सकाळी त्यांनी मेहुण्याच्या मित्राला मी विषारी द्रव घेतलं आहे. आता नदीत उडी मारून आत्महत्या करीत आहे, असे फोनवरून त्यांनी सांगितले. त्यानंतर याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आणि नदी पात्रातून अतुलचा मृतदेह बाहेर काढला. अतुलच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही असे पोलिसांनी सांगितले.