TET Scam | TET गैरप्रकारानंतर 1,023 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे वेतन थांबवले

 TET Scam | pune ordered of not to pay salary from august to 1023 primary and secondary school teachers

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन TET Scam | शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारात (TET Scam) अपात्र ठरविण्यात आलेल्या 576 शिक्षकांचे (Teacher) ऑगस्टपासूनचे वेतन (Salary) न देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालयाने (Directorate of Primary Education) नुकतेच दिले. त्यानंतर आता माध्यमिकच्या 447 शिक्षकांचेही वेतन न देण्याचे आदेश माध्यमिक आणि उच्च उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने (Directorates of Secondary and Higher Secondary Education) दिले असून, प्राथमिक आणि माध्यमिक मिळून 1 हजार 23 शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

माध्यमिकचे 447 शिक्षक राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्याने उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर (Mahesh Palkar) यांनी संबंधितांचे ऑगस्टपासूनचे वेतन थांबवण्याचे पत्र सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक (Divisional Deputy Director of Education), जिल्हा परिषदांचे (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षणाधिकारी, भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) पथक, महापालिकांचे प्रशासन अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळाचे मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

 

टीईटी परीक्षा 2019 मध्ये झालेल्या गैरप्रकारातील (TET Scam) समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे आणि कारवाई निश्चित करण्यासंदर्भात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून (Commissioner of Board of Examinations) प्राथमिक शिक्षण संचालनालयाला उमेदवारांची यादी देण्यात आली.
या यादीतील संबंधित उमेदवारांचे आधार कार्ड (Aadhar Card) आणि शालार्थ आयडीनुसार (School ID),
मॅपिंग करण्यात आले असता अपात्र उमेदवारांपैकी 576 उमेदवार शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक कार्यरत आहेत
आणि वेतन अनुदान घेत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधित 576 उमेदवारांना वेतन अनुदान किंवा
फरक देयक दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

उमेदवारांची पडताळणी करा
परीक्षा परिषदेने संकेतस्थळावर अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील अपात्र उमेदवारांची शहानिशा करुन वेतन थांबवलेल्या 447 उमेदवारां व्यतिरिक्त अन्य
उमेदवारांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये आढळल्यास त्यांचे शालार्थ आयडी गोठवण्यात बाबत संचालनालयाला कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- TET Scam | pune ordered of not to pay salary from august to 1023 primary and secondary school teachers

 

हे देखील वाचा :

NCP MLA Amol Mikari On BJP Mohit Kamboj | रोहित पवारांवरील ट्विटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका; म्हणाले – ‘कंबोज नावाच्या भोंग्याला…’

Indian Marathi Film Corporation | जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि यशवंत गायकवाड यांच्याकडून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दोन एकर जागा दान

CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे