अकोला : बहुजननामा ऑनलाईन – १० वर्षीय मुलीवर गावातीलच मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार १० जूलै रोजी अंजनी बु. येथे उघडकिस आला आहे. याप्रकऱणी बार्शी टाकळी पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील विनोद डोंगरे (रा. अंजनी बु.) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अंजनी येथील दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. घडलेली घटना पिडीत मुलीने आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी बार्शी टाकळी पोलिसांनी स्वप्नील डोंगरे विरुद्ध भादंवी कलम ३७६,१२, पोस्को नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी गावातून पसार झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण करीत आहेत.