नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कर प्रकरणासंबंधित निर्णय आज अखेर न्यायालयाने सुनावला आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने सोमवारी आपला निर्णय सुनावताना सांगितले की भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर याला दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच आणखी एका आरोपीला शशि सिंह यांना न्यायालयाने निर्दोष सोडले आहेत. 2017 मध्ये पीडितेबरोबर दुष्कर्म झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर 2018 मध्ये सीबीआयने संबंधित प्रकरण दाखल केले होते. अशी माहिती मिळत आहे की शिक्षेवर 19 डिसेंबरला चर्चा होईल. सेंगरच्या विरोधात बलात्कार आणि अपहरणाप्रकरणी तीस हजारी कोर्टात सुनावणी सुरु होती. सेंगरवर आता 3 प्रकरणं दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टात सुरु आहेत. आता सेंगरला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. कुलदीप सेंगरला 15 एप्रिल 2018 ला ताब्यात घेण्यात आले होते.
Unnao rape & kidnapping case: Quantum of sentence to former BJP MLA Kuldeep Singh Sengar to be pronounced tomorrow. https://t.co/gMTNMBbOtP
— ANI (@ANI) December 16, 2019
न्यायालयात शशि सिंह याच्या विरोधात पर्याप्त पुरावे नसल्याने आणि या प्रकरणात थेट हात असल्याची भूमिका स्पष्ट न झाल्याने त्याला न्यायालयाने निर्दोष ठरवले.
सीबीआयला फटकारले –
याबरोबर न्यायालयाने सीबीआयला सुनावले. न्यायालयाने या प्रकरणी तपासात उशीर केल्याने आणि चार्जशीट दाखल करण्यात उशीर केल्याने सीबीआयला सुनावले. न्यायालयाने सीबीआयला सुनावताना म्हणाले की चार्जशीट फाइल करण्यात एक वर्ष लावण्यात आले. यामुळे तपास यंत्रणांना न्यायालयाकडून प्रश्न विचारण्यात आले. न्यायालयाने सांगितले की तपास यंत्रणेने पीडितेला अनेकदा चौकशीसाठी बोलावले परंतू सीबीआय आधिकाऱ्यांनी पीडितेकडे प्रकरणाची माहिती घ्यायला जायला हावे होते.
पॉवरफूल व्यक्तीशी लढत होती पीडिता –
न्यायलायाने निकाल दिला की पीडिता घटनेवेळी अल्पवयीन होती आणि तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार झाला. ती घाबरली होती. तिला अनेकदा धमक्या देण्यात आल्या. तिच्या कुटूंबाला धोका होता. न्यायालयाने सांगितले की ती एका पॉवरफुल व्यक्तीशी लढत होती आणि यामुळे पीडितेच्या कुटूंबावर खोट्या केसेस देखील लावण्यात आल्या.