बहुजननामा ऑनलाइन : टीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील सर्व पात्रांना चांगलीच पसंती मिळाली असून सर्वांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यातील एक नाव म्हणजे पोपटलाल. मालिकेत पोपटलाल नेहमीच आपल्या लग्नाबद्दल बोलताना दिसतो. 13 वर्षे झाली पण पोपटलालला अजून एक जोडीदार सापडला नाही आणि तो तिचा शोध घेत आहे. परंतु, पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठक खर्या आयुष्यात लग्न झालेला आहे आणि 3 मुलांचा बाप आहे.
श्याम पाठक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह राहतो. तो शोच्या कास्टसह फोटो शेअर करत असतोच, परंतु तो कुटुंबीयांसहही फोटो शेअर करतात. श्याम पाठक यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 2003 साली रेशमी पाठकशी लग्न केले. म्हणजे वास्तविक जीवनात पोपटलालच्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत. त्यांना 3 मुले देखील आहेत. श्याम पाठक आपल्या मुलांबरोबरही बरीच छायाचित्रे शेअर करतात.
पोपटलालची व्यक्तिरेखा साकारणार्या श्याम पाठकची चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या छत्रीसह चालण्याची शैली, लग्नाबद्दल नेहमीच एक अस्वस्थता, त्याचा राग आणि रागात दुनिया हिला दूंगा असे म्हणणे प्रेक्षकांना फार आवडते. दरवर्षी गोकुळधामचे कुटुंबीय पोपटलाल यांचे लग्न झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करतात; परंतु ते होत नाही. पोपटलाल गेल्या 13 वर्षांपासून (शोच्या सुरुवातीपासूनच) अपेक्षा करतो, की कुटुंब आपले लग्न कोठे ना कोठे ठरवतीलच , मात्र ते अद्याप झाले नाही.