बहुजननामा ऑनलाइन टीम : त्रिची येथील शेतकरी पी. शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ मंदिर बांधले आहे. 50 वर्षाचे शंकर हे त्रिची जिल्ह्यातील इराकुडी गावचे रहिवासी आहे. त्यांनी स्वत: च्या पैशाने पंतप्रधानांसाठी मंदिर बांधले आहे. भाजपाचे स्वयंसेवक शंकर यांनी आपल्या शेतजमिनीवर हे मंदिर बनवले आहे आणि ते दररोज सकाळी या मंदिरात मंत्रोच्चार करतात आणि मंत्र पठण ही करतात.
शंकर यांच्याकडे मंदिरासाठी पुरेसे पैसे नसल्याने हे मंदिर तयार करण्यास 8 महिने लागले. मंदिराच्या आत पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमधील पंतप्रधानांचा पुतळा दिसत आहे. या मंदिराच्या भिंतींवर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता, विद्यमान सीएम पलानीसामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटोसुद्धा लावलेले दिसत आहे.
हे मंदिर पाहण्यासाठी लोक लांबून आले आहेत. शंकर आपल्या गावात शेतकरी संघाचे अध्यक्ष देखील आहेत. ते म्हणतात की, 2014 मध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधण्याचा विचार करत होते. मात्र आर्थिक परिस्थिती ठिक नसल्यामुळे त्यांना हे शक्य झाले नाही. शंकर यांनी बनवलेल्या मंदिरामध्ये मोदींची मुर्तीची उंची 2 फुट आहे.
Visit : bahujannama.com