पुणे / तळेगाव दाभाडे : बहुजननामा ऑनलाईन – तळ्याकाठी मुलांसोबत फिरण्यासाठी गेले असताना पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवत असताना वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळमधील तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि.6) सायंकाळी घडली. योगेश शंकर नारखेडे (वय 37, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. योगेश नारखेडे हे व्यवसायाने होमिओपॅथी एमडी (homeopathy MD) डॉक्टर (Doctor) होते.
योगेश नारखेडे हे रविवारी सायंकाळी अविनाश (वय 7) आणि दिवेश (वय 3) यांना घेऊन फिरण्यासाठी तळ्याकाठी गेले होते. त्यावेळी अविनाश पाय घसरून तळ्याच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी (rescu) योगेश हे पाण्यात (Water) उतरले असता, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. योगेश यांनी अविनाशला पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. मात्र, त्यांना स्वत:चा जीव वाचवता आला नाही.
डॉ. योगेश नारखेडे यांना पोहता येत नसल्याने ते तळ्यात साचलेल्या गाळात अडकले. नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. डॉ. योगेश हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक शंकर नारखेडे यांचे चिरंजीव होते.