बहुजननामा ऑनलाईन टीम : Taapsee Pannu | अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. 2021 मध्ये तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ हा मिस्टरी थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. तर आता पुन्हा एकदा या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंबंधीची माहिती स्वतः तपसीने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत दिली आहे. (Taapsee Pannu)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटाच्या पोस्टर मध्ये तापसी लाल रंगाची साडी त्याचबरोबर बॅकलेस ब्लाऊज अशा लुक मध्ये दिसत आहे. तर तिच्यासमोर ताजमहल आणि तिचे हात रक्ताने माखलेले दिसत आहे. पोस्टर शेअर करत तापसीने कॅप्शन मध्ये म्हटले की, “एक नए शहर में फिर एक बार…तहलका मचाने आ रही है, हमारी हसीन दिलरुबा”. आता तापसी च्या या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Taapsee Pannu)
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.
सध्या तापसीने शेअर केलेल्या या पोस्टरवर अनेकांनी कमेंट केले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
या चित्रपटाचा पहिला भाग नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज झाला होता.
त्याच पद्धतीने हा दुसरा भाग देखील नेटफ्लिक्स वर रिलीज होणार का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
हसीन दिलरुबा’ या चित्रपटात विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे, आदित्य श्रीवास्तव या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Taapsee Pannu | taapsee pannu share upcoming film phir aayi haseen dillruba poster on social media
हे देखील वाचा :
Pune Crime News | कोयता गँगचा म्होरक्या गुन्हे शाखेकडून गजाआड, आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई
Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 8 दिवस थंडीचा जोर कायम; ‘या’ जिल्हांना इशारा