इंदूर : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) टी20 मालिका (T20 World Cup) जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team India) वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दोन्ही मालिका जिंकल्यानंतर टीमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत (Pakistan) होणार आहे. पण या वर्ल्ड कप मोहिमेत एका खेळाडूच्या बाबतीत रोहित शर्मा (Rohit Sharma) वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या खेळाडूचे नाव आहे दिनेश कार्तिक (Dinesh Karthik). या खेळाडूने नुकत्याच पार पडलेल्या दोन्ही मालिकांमध्ये स्वत:ला दोन प्रकारे सिद्ध केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/BCCI/status/1577331804293705728
या वर्ल्ड कपमध्ये कार्तिकचा रोल काय?
दिनेश कार्तिकने गेल्या काही सामन्यात त्याला देण्यात आलेली फिनिशरची भूमिका उत्तम पार पाडली आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या टी20 सामन्यात (T20 World Cup) रोहितने एक वेगळा निर्णय घेत दिनेश कार्तिकला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. यानंतर कार्तिक चौथ्या नंबरवर बॅटिंगला आला आणि तो ही पॉवर प्लेमध्ये (Power Play). यानंतर त्याने पॉवर प्लेचा फायदा उचलत त्या सामन्यात धुरळा केला. या सामन्यात त्याने अवघ्या 21 बॉल्समध्ये 46 धावा फटकावल्या. यामध्ये 4 फोर आणि 4 सिक्सर्सचा समावेश होता.
बुमराह आणि जडेजा वर्ल्डकप मधून बाहेर
दुखापतीमुळे भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.
त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. तसेच भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजादेखील (Ravindra Jadeja) या अगोदर वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार हे मात्र अजून BCCI ने जाहीर केलेले नाही.या बाबतीत ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे रोहितकडून सांगण्यात आले आहे. भारतीय संघ बुधवारी रात्री 14 खेळाडूंसह ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- T20 World Cup | dinesh karthik match finisher or power play specialist
हे देखील वाचा :
Pune Crime | पैशाच्या लोभापायी पैसे गेले अन् जमीनही; २५ लाख फसवणूक प्रकरणी FIR