बहुजननामा ऑनलाईन – Swapnil Joshi | सध्या अभिनेता रितेश देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वेड (Ved Movie) या चित्रपटासोबतच बॉक्स ऑफिसवर ‘वाळवी’ या चित्रपट देखील चांगलाच गल्ला जमवताना दिसत आहे. आता स्वप्निल जोशी यांनी वेड चित्रपटाबाबत केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. (Swapnil Joshi)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वेड चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तर पत्नी जेनेलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकत असल्याने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच प्रतिक्रिया मिळत आहे. आता स्वप्निल जोशीने ट्विट करत या दोघांचे देखील अभिनंदन केले आहे. यावेळेस स्वप्नील जोशीने ट्विट करत म्हटले की, ““वेड” आज BO वर 50 कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन रितेश भाऊ, जिनिलीया वैनी आणि पूर्ण टीम!”. (Swapnil Joshi)
“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल !
केवळ क. मा. ल. कामगिरी !
मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन @Riteishd भाऊ, @geneliad वैनी आणि पूर्ण टीम!— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) January 18, 2023
स्वप्निल जोशीच्या या ट्वीटवर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनीही रिप्लाय दिला आहे. या ट्विटला रितेशने कमेंट करत म्हटले की, “भाऊ मनापासून आभार…. big hug लवकर भेटू !!!”
भाऊ …. मनापासून आभार – big hug @swwapniljoshi लवकर भेटू !!! https://t.co/NPozVZXQYX
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 18, 2023
तर अभिनेत्री जेनेलिया देशमुख ने प्रतिक्रिया देत म्हटले की, “तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद”.
https://twitter.com/geneliad/status/1615729815319121921
वेड या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया सोबत अशोक सराफ,विद्याधर जोशी अशी तगडी स्टार
कास्ट पहायला मिळत आहे. वेड या चित्रपटाने आतापर्यंत 47 कोटी 66 लाख रुपये इतका गल्ला केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :-
3
3
हे देखील वाचा :
Ved Movie | ‘वेड’ चित्रपट आता नव्या रुपात; चित्रपटामध्ये करण्यात आले ‘हे’ बदल