पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | चंदननगर (Chandan Nagar, Pune) परिसरात उघडया पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत 10 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकुण 42 हजार 790 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी जुगार खेळणार्या 10 आणि फरार असलेल्या एका अशा एकुण 11 जणांविरूध्द चंदननगर पोलिस ठाण्यात
(Chandan Nagar Police) महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्यांना पुढील कारवईसाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अति वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या
मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार (SR PI Vijay Kumbhar),
सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
Web Title :- Pune Crime News | SS cell of the pune police crime branch raided a gambling den in Chandannagar area
हे देखील वाचा :
Ved Movie | ‘वेड’ चित्रपट आता नव्या रुपात; चित्रपटामध्ये करण्यात आले ‘हे’ बदल