नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या बांद्रा येथील फ्लॅट मध्ये उपस्थित असणारे त्याचा स्टाफ आणि मित्र सिद्धार्थ पिठानीच्या चौकशीनंतर आता सीबीआय रिया चक्रावर्तीची चौकशी करणार आहे. सीबीआय आता कोणत्याही क्षणी रियाला चौकशीसाठी बोलवू शकते.
असं सांगितलं जातंय की, सीबीआय रियाला आज चौकशीसाठी बोलवू शकते. अशातच रियाला सीबीआयच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. याआधी ईडीकडून रियाची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. त्यावेळी रियासोबत तिचा भाऊ आणि वडील उपस्थित होते. रियाला चौकशी दरम्यान सीबीआय खालील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
रियाला काय प्रश्न विचारू शकते सीबीआय?
1. सुशांत सोबत कसे संबंध होते?
2. सुशांत डिप्रेशन मध्ये होता का?
3. 8 जूनला सुशांतचं घर सोडून का निघून गेली?
4. सुशांतसोबत भांडण झालं होतं का?
5. घरून गेल्यावर सुशांतशी बोलणं झालं का?
6. सुशांतला शेवटचा फोन कधी केला होता?
7. सुशांतच्या खात्यातील पैसे कुठं गेले?
8. तुम्ही दोघे लग्न करणार होता का?
9. सुशांतच्या कुटुंबासोबत कसे संबंध होते?
10. युरोप ट्रिप मध्ये काय झालं होतं?
11. युरोप टूर मध्ये सोविक का गेला होता?
12. युरोप ट्रिप मध्ये सुशांतशिवाय अन्य कोणाला भेटली? कोण होते ते लोक?
13. सुशांतला किती डॉक्टरांकडे दाखवण्यात आलं?
14. वाटर स्टोन रिपोर्टची पूर्ण कहाणी काय? कोणती रूम बुक केली होती?
15.सुशांत आजारी होता तर नवीन कंपनी का सुरु केली?
16. या कंपनीमध्ये तुझे वडील आणि भाऊ का सहभागी होते?
17. सुशांतने कधी त्याची विल बनवली होती का?
18. 8 जून नंतर सुशांतला कॉल का केला नाही, मेसेज केला नाही?
19. महेश भट्ट सोबत एवढं बोलण्याचे कारण काय? प्रत्येक बाबतीत त्यांचा सल्ला घेत होती की फक्त सुशांत संदर्भात?
आज नीरज, सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंत यांची देखील चौकशी केली जाऊ शकते. अशी माहिती मिळाली आहे की, सीबीआय रियाच्या चौकशीनंतर नीरज, सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंत यांची समोरासमोर बसून चौकशी करू शकते. हे तिघेजण सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या फ्लॅटमध्ये उपस्थित होते. त्यामुळे या तिघांची चौकशी सुरु आहे.