मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. रिया चक्रवर्तीला अटक करण्यात यावी अशी मागणी सुशांतच्या कुटुंबीयांची आहे. मात्र, सीबीआयचे माजी सहसंचालक शांतनु सेन यांच्या म्हणण्यानुसार रिया चक्रवर्तीला अद्याप अटक केली जाणार नाही. शांतनु सेन म्हणाले की, रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे आणि चौकशीच सुरु राहील. जेव्हा कोणी पळून जाते, चौकशी करण्यात अडचण येते, रिमांड घ्यावा लागतो, तेव्हा त्याला अटक केली जाते. आता येथे रिमांड घेण्याची गरज नाही, ती (रिया) सीबीआयला चौकशीत मदत करत आहे.
सीबीआयचे माजी सहसंचालक शांतनु सेन यांचे म्हणणे आहे की, आज सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्ती सीबीआयसमोर हजर झाली. रियाची सीबीआय टीमची चौकशी सुरूच आहे. सीबीआयचे 3 संघ प्रत्येक अँगलमधून प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, तिला तातडीने अटक करता येणार नाही. असे सांगितले जात आहे की, सीबीआय रियाकडून अनेक बाबींवर प्रश्न विचारत आहे.
यामध्ये ड्रग्ज कनेक्शन, पैशांचा व्यवहार, सुशांतला ड्रग्स देणे, सुशांत संग रिलेशनशिप, युरोप टूर, सुशांतचे कौटुंबिक नाते, सुशांतचे डिप्रेशन, 8 जूनचे रहस्य, सुशांत सोबत ब्रेकअप, सुशांत सोबत फिल्म, सुशांतचा मृत्यू अश्या सर्व अँगलवरील प्रश्नांचा समावेश आहे. सुशांतसिंह राजपूतचे फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीचीही आज सीबीआयने चौकशी केली. चौकशीनंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला कुठेतरी बाहेर घेऊन गेले. गेल्या अनेक दिवसांपासून एजन्सी सिद्धार्थ पिठणीकडे चौकशी करीत होती. त्याची बरेच तास चौकशी केली जात होती. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सिद्धार्थ पिठणी घरात उपस्थित होता.