नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्सवाचा हंगाम सुरू झाला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी देशभरात तयारी सुरू आहे. दरम्यान, गुजरातमधील सूरत येथील एका मिठाईच्या दुकानात स्थानिक मिठाईची किंमत 9000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. या खास लोकल मिठाईला वेगळ्या स्टाईलमध्ये बनविले जाते. दरम्यान, गोल्ड घारी नावाची मिठाई ही सूरतची स्थानिक मिठाई आहे. ही हरभरा डाळ, तूप आणि सुखा मेवा घालून बनवले जाते. हे शेव, गांठिया, फ्राय पोहे, बुंदी आणि पापडी यांचे मिश्रण सोबत दिले जाते.
वृत्तसंस्था एएनआयने या दुकान आणि मिठाईचे फोटो सामायिक केले आहेत. चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत कि, सुवर्ण रंगाची ही मिठाई लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. गुजरातमध्ये ही घारीची मिठाई दिवाळी व इतर सणांमध्ये बरीच विकली जाते. या मिठाईची विक्री विशेषत: सुरत शहरात जास्त आहे. 820 रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या या मिठाईची किंमत सध्या 9000 रुपये प्रति किलो आहे.
मिठाई दुकानदाराचे म्हणणे आहे की, ते महाग आहे कारण गोल्ड घरी वर सोन्याचे वर्क केले जाते. सोने हे निरोगी मानले जाते. सध्या याची मागणी कमी आहे पण येत्या काही दिवसांत मागणी वाढेल आणि लोकांनाही ही मिठाई आवडेल अशी अपेक्षा आहे.