बहुजननामा ऑनलाईन टीम : फिल्म आणि टीव्हीची प्रोड्युसर एकता कपूर (Ekta Kapoor) आपल्या मालिकांसाठी खूपच फेमस आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजी (ALTBalaji) वरील तिची वेब सीरिज एक्स एक्स एक्स (XXX) मधील काही आक्षेपार्ह सीन्समुळं ती वादात सापडली होती. या प्रकरणी तिच्या विरोधात इंदोरमध्ये दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी सुप्रीम कोर्टानं गुरुवारी तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे.
मु्ख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मध्य प्रदेश हाकोर्टाच्या 11 नोव्हेंबरच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या एकता कपूरच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश पारित केला आहे. हायकोर्टानं या प्रकरणी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता.
या खंडपीठात न्यायमुर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमुर्ती व्ही रामासुब्रमण्यन सहभागी आहेत. खंडपीठानं आपल्या आदेशात सांगितलं की, नोटीस जारी करा. या दरम्यान अटकेवर अंतरिम स्थगिती असेल. एकताची बाजू मांडणारे वरिष्ठ वकिल मुकुल रोहतगी असं म्हणाले की, या प्रकरणी त्यांच्या अशीलाला अटक केलं जाऊ शकतं.
एकता कपूर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे ज्यात आरोप लावण्यात आला आहे की, या वेबी सीरिजमधील एका एपिसोडमध्ये अश्लीलता पसरवण्यात आली आहे आणि धार्मिक भावनाही दुखावण्याचं काम केलं आहे.