चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – Suicide News | खाणावळ चालवणार्या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide ) केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात (Chandrapur) घडली आहे. चंद्रभान दुबे (60), मंजू दुबे (50) रा. टॉवर टेकडी अशी त्यांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या दाम्पत्याने कोरोना काळात व्यवसाय डबघाईला आल्याने आर्थिक तंगीतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चंद्रभान दुबे व मंजू दुबे या दाम्पत्याचे चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ममता भोजनालय आहे सोमवारी काही नागरिक फिरायला गेले असताना त्यांना भोजनालयातून दुर्गंधी येऊ लागली. काही लोकांनी भोजनालयात डोकावून पाहिले असता चंद्रकांत दुबे हे खाली पडलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आले. दोघांनी दोन ते तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक संस्था आणि कार्यालये बंद असल्याने त्यांची खाणावळ डबघाईला आल्याने आर्थिक तंगीतून दाम्पत्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे.
Web Title : Suicide News | decomposted body found bhojanalay director couple commits suicide
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज
Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !