बहुजननामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी(suhana khan) सुहाना खान हिनं काही दिवसांपूर्वीच(suhana khan) तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते ज्यात ती चक्क रडताना दिसत होती. या फोटोंची खूप चर्चा झाली होती. सुहाना आपल्या फोटोंमुळं आणि व्हिडीओंमुळं नेहमीच चर्चेत येत असते. नुकताच तिचा एक फोटो समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
सुहानानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे जो सध्या चर्चेत आहे. यात सुहाना खूपच हॉट दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. सोबत तिनं शॉर्ट डेनिम घातली आहे. या लुकमध्ये सुहाना खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
सुहानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.
खास बात अशी की, सुहानाच्या या फोटोवर तिची आई गौरी खान हिनंही हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. गौरीलाही हा फोटो खूप आवडला आहे.
सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.
https://www.instagram.com/p/B-XCUqTHC6r/
https://www.instagram.com/p/BeI_PjfF6RR/